शुक्रवार, २४ जुलै, २०२०

बालकविता - शाळा मजेमजेची



शाळा मजेमजेची
शाळाही सुंदर
वर्गही सुंदर
बागही सुंदर
     मजे मजेची

नका करु दंगा
करा छान रांगा
परिपाठ सांगा
       मजेमजेचा

गाणी गोष्टी छान
खेळण्या मैदान
खेळ छान छान
        मजे मजेचे

नाचण्यात दंग
गाण्यातही रंग
खिचडी खमंग
      मजेमजेची

शिक्षा झाली बंद
मुलाना आनंद
शिक्षणाचा छंद
        मजेमजेचा

मुले होता गोळा
सारे खेळ खेळा
अशी माझी शाळा
          मजे मजेची

   ___जयवंत जाधव,कोवाड
         मोबा. =9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा