*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१८२)
वंशपरंपरेने नेते पाळणे हे
आपलेच खरे पातक आहे.
व्यक्ति निष्ठा राजकारणात
लोकशाहीसाठी घातक आहे.
१८३)
'हातवारे आणि नकला' प्रचारात
उल्लूगिरीचा फॅक्टर आहे.
धोरण कमी, अभिनयच जास्त
नेता कसलेला अॅक्टर आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment