Monday, April 10, 2023

लोकशाही रुजलीच नाही

लोकशाही रुजलीच नाही

'भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ' ही निती
 मेंदूपर्यत कुणाच्या पोचलीच नाही.
 घराणेशाहीच्या या भारत देशात
 लोकशाही कधी रुजलीच नाही .  ॥धृ॥

        खालचा खाली आणि वरचा वरच
        विषमतेची दरी कधी मुजलीच नाही.
        गीता , कुराण , बायबलच्या गर्दीत
        'घटना' कुणी कधी पुजलीच नाही.
        घराणेशाहीच्या या भारत देशात
        लोकशाही कधी रुजलीच नाही . ॥ १ ॥

तुडूंब भरल्या तिजोऱ्या तरी
लुटारुंची हाव कधी भागलीच नाही.
खंडणी, लाच घेतांना नेत्यांसह
नोकरशाहीही कधी लाजलीच नाही 
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही ॥ २ ॥

       विरोधात असता 'विकासाची बात'
       सत्तेत प्रगती कधी सुचलीच नाही
       विरोधासाठीच  विरोध  केवळ
       चांगल्यासाठी टाळी कधी वाजलीच नाही.
       घराणेशाहीच्या या भारत देशात
       लोकशाही कधी रुजलीच नाही.  ॥ ३ ॥

गुलामगिरीचे ढग जमले देशावर 
स्वातंत्र्यात जनता कधी भिजलीच नाही.
खऱ्या लोकशाहीसाठी मतदारांनी
प्रबळ 'मत निती' कधी योजलीच नाही.
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही  ॥ ४ ॥



              @ जयवंत जाधव, कोवाड
              ता.चंदगड जि. कोल्हापूर
              मोबाईल - 9403463881