Friday, July 31, 2020

कविता - डोंगर रांगा

कविता - वसंत

बालकविता १) सोनीची शाळा २ ) सोनीचे पुस्तक

बालकविता - सोनीचा नाष्टा

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नवनाथ गोरे व जेष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या सोबत

कविता - माती मोल

मराठी साहित्य संमेलन कडोली येथे कविता वाचन करताना ....

वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या सोबत

कविता - काहूर

काहूर

सारं का बदलतंय ? मनी उठलं काहूर ॥ धृ ॥
पै पाहुणे, सगे शेजारी
भरभरुन बोलायचे
मोबाईलमुळे अवघड झाले
तोंड आता खोलायचे
पूर्वी सर्व लोकांचे मस्त जुळायचे सूर
एकमेकांपासून आता खूप चाललेत दूर ॥ १ ॥

वडीलधाऱ्या जाणत्यांना
पूर्वी होता खुपच मान
गुरुंनाही होते एकेकाळी
देवापेक्षाही मोठे स्थान
सारे ते पाहून माझा भरायचा ऊर
सस्काराचा का होतोय आताच चक्काचूर ॥ २ ॥

पूर्वी कधी कव्हती अशी
झटपट लगीनघाई
उभयतांचा स्पर्शही होण्यास
वर्ष दीडवर्ष जाई
पाहतांच एकमेका लाजून होत चूर
ओंगळ आता रित नि जुळत नाहीत सूर  ॥ ३ ॥

मैदानी नि ताकदीचे
होते छोटे मोठे खेळ
मोबाईलच्या खेळात सध्या
बरबाद होतोय वेळ
राकट सारे पूर्वी नि होता दमही भरपूर
साध्या थंडी वाऱ्यानेही आता होते कुरकूर ॥ ४ ॥

ज्या त्या ठरल्यावेळीच
पाऊस सर पडायची
आता का अवेळी नि
वेळ येते रजायची ?
नदी, नाले भरुन पूर्वी यायचा महापूर
आता का होत नाहीत कोरडे दुष्काळ दूर ॥ ५ ॥

कविता - हिवाळा

हिवाळा


पाने फुले गेली गारठून
नद्या तलाव गार गोठून

शितल वारा येता भरभर
कांती कापते किती थरथर

धुक्याची थंडी अंगी हुडहुड
थंडीने दात वाजती कुडकुड

घालू लोकरी गरम बंडी
शेकू शेकोटी पळेल थंडी

कितीही भले येतील ऋतू
आवडतो मज तू परंतु 

      जयवंत जाधव कोवाड
      ता चंदगड जि कोल्हापूर
      मो  9403463881

बालकविता - पाने

पाने


माडाच्या झाडाचे
पान तलवार
ऊसाचेही पान
लांब धारदार

भले मोठे पान
लांबट केळीचे
इवलेसे पान
आंबट चिंचेचे

पान रबराचे
जाड किती वाटे
निवडुंगाची त्या
पाने झाली काटे

एरंडाचे पान
आकाराने तारा
सगुणेचे पान
स्पर्श खरखरा

आळू मखमली
ना पाणी टिकतं
कमळाच्या पाना
ना पाणी डसतं

वनस्पतीची पाने
विविध गुणाची
नटली ही वने
किमया कुणाची ?

   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कविता - दुष्काळ

दुष्काळ
पिक नाही पाणी नाही
भयान ऊन पेटलेले
दुष्काळाच्या झळामध्ये
लोक सारे विटलेले

करुन काबाड कष्ट
रक्त सारे आटलेले
वाळलेले अंग आणि
वस्त्र सुद्धा फाटलेले

मुलेबाळे उपाशीच
मरणाला टेकलेले
बिचारे वाळून गेले
कुणीतरी पुटपुटले

आ वासुन गुरे ढोरे
डोळे थोडे मिटलेले
चारा नाही पाणी नाही
कसे तरी टिकलेले

आठवून सारे काही
कंठ त्याचे दाटलेले
संसार सारे पोरके झाले
स्वर्गासम नटलेले

अजूनही शांत नाही
आभाळ हे पेटलेले
वारे कधी शांत होणार
आगीसम सुटलेले

ढग केव्हा जमा होतील
जीवन थेंब साठलेले
पुन्हा कधी उजाळेल
नशीब हे फुटलेले


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881
,

कविता - नको ते आहे स्वस्त

नको ते आहे स्वस्त
🇱🇺🇱🇺🇱🇺🇱🇺🇱🇺🇱🇺

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त 
पाहिजे ते सोडून नको ते आहे स्वस्त

छेडाछेडी करण्यासाठी लागत नाही पैसा
बलात्काऱ्यांसाठी इथला कायदा ऐसा वैसा
अब्रु लुटती सर्वांसमक्ष रात्री नि भर दिवसा
निवांत आहे शासन नि मंत्रीही आहेत मस्त
खरंच सांगतो भारतात अब्रु झाली स्वस्त

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून नको ते आहे स्वस्त

शेतात राबून भार्याच्या नशिबी फाटका पदर
दलालांच्या हाती धान्य मुलांचे रिकामे उदर
पडके घर विसाव्याला लक्तरे झाली चादर
कर्जासाठी जीव दिला तरी शासन आहे सुस्त
खरंच सांगतो इथल्या बळीराजाचे मरण स्वस्त

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून नको ते आहे स्वस्त

मोठमोठ्याने ठोकायच्या नुसत्या आरोळ्या
भावनेला हात घालूनी भाजून घ्यायच्या पोळ्या
चिंता नाही देशाची नेत्यांना, सैनिक झेलती गोळ्या
कितीतरी जीव हुतात्मे सीमेवर घालता गस्त
खरेच सांगतो भारतात सैन्यांचे मरण स्वस्त

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून नको ते आहे स्वस्त

   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कविता - दिनक्रम

दिनक्रम

उजळला हा घाट
रंग नारंगी दाट
झाली आता पहाट
          लागा कामाला

सुर्य हा डोईवर
प्रकाश प्रखर
झाली आता दुपार
         थोडा विसावा

सुर्य ढळला खाली
पसरली सावली
पहा संध्याकाळ झाली
          घरी परता

ते रातकिडे मात्र
गाती झोपेचे मंत्र
झाली आता रात्र
        निद्रा घेण्याला

   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कविता - चांदण्या

चांदण्या

रात्र निरभ्र झाली सारी
माळ नक्षत्रांची चमके भारी

जसे हिरे माणके पाचू मोती
तशी उजळती स्वतःभोवती

नभी पसरल्या चांदण्या
जणू साऱ्या विस्कटल्या मण्या

दृष्टी जाता एकावरती
क्षणात दिसती क्षणात लपती

असा चाले या खेळ चांदण्यांचा
हुलकावणीचा खेळ मजेचा

या मुलांनो बाहेर तुम्ही
मोजूया साऱ्या चांदण्या आम्ही


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कविता - अटळ

अटळ

जेथे असतो भास्कर
तेथे असते वासर

जेथे असतील द्रुम
तेथे फुलती कुसूम

जेथे असते अंबर
तेथे जोत्सांचे झुंबर

जेथे असते तरंगिणी
तेथे असतेच पाणी

जेथे असते समीरण
तेथे सर्वांचे जीवन

जेथे असतो मनुष्य
तेथे गुण आणि दोष


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कविता - अभागी

अभागी

ऊसाच्या बुडक्यावर
घाव कोयत्याचा
वेगळं करायला अगदी मूळापासून
सोलताना पाला, छाटताना वाडे धडावेगळे
काढतात पिळून
चरख्यात
गोड रसासाठी, साखरेसाठी
ऊसाच्या वेदनेची पर्वा न करता .
ऐकू येत नाहीत
ऊसाच्या आर्त किंकाळ्या
बहिरे झालेत कान
बधीर झालंय मन
पोटासाठी
'ऊस' आणि माझे 'शिक्षण'
काय वेगळे?
मूळापासुन तोडणारे हेच
माझे गबळी मायबाप
मी अभागी
गबाळ्याचं
पोर


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कविता - भेद

भेद

चार चाकी गाड्यांना
रस्ता पसरट
पादचारी चालताना
होते कसरत

एसी बुलेट ट्रेन
रावांना विमान
गरिबांच्या एसटीकडे
मूळी नाही ध्यान

झोपड्या साऱ्या पाडून
बांधले टॉवर
पिण्या नाही पाणी आम्हा
श्रीमंताना शॉवर

खाजगी कंपन्याना
देऊन मलिदा
सरकारी शाळांच्याच
केल्या कमी सुविधा

वायफाय नेट कशा
पोटा नाही अन्न
सेझच्या नावाने माझी
लाटली जमीन


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

मी ज्या श्रीराम विद्यालयात शिकलो त्या वर्गाचे आठवी ते दहावीचे वर्ग ( जुनी इमारत )

कवी कथाकार जयवंत जाधव

कविता सादर करताना कवी जयवंत जाधव

कविता - दौलत

कविता - मोर्चा

कविता - वासनांध

मराठी युवा साहित्य संमेलन कोवाड मध्ये कविता सादर करताना कवी जयवंत जाधव ( स्क्रिनवर ) व समोर उपस्थित रसिक

कविता - वनातील प्राणी

कविता - मी एक वेल

कविता - निवडूंग

Sunday, July 26, 2020

कोवाड गावची कविता

कोवाड: 🙏🏼🙏🏼"गाव भक्तीगीत "🙏🏼🙏🏼

*महती कोवाड नगरीची*

घडली ताम्रपर्णीच्या मूशीत l वसली टेकडीच्या कुशीत ll
नेहमी नांदते खुशीत l माझी नगरी कोवाडची ॥१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

ताम्रपर्णीचे पाणी लाल l संथ आहे तिची चाल ll
उजाळले गावचे भाल l कृपा या अमृतजलाची  ॥२ ॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

होती इथे इनामदारी l नांदली बारा बलुतेदारी ll
सुखशांती घरोघरी l नोंद असे इतिहासाची ॥३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पिक भूईमूग.ऊस,भात l चव इथल्या कडधान्यात ll
सुपिकता काळ्या शेतात l आई बळीराजाची ॥४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पूर्वी नदीवर होत्या नावा I मग जुनेधरण बेळगावकडचा दुवा ॥
आता पर्याय पूल नवा | सोय झाली प्रवाशांची ॥५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गायरान आहे तळीमाळ l रंगतात इथे विविध खेळ ll
गुरांसोबत बाळगोपाळ l सावली भीम मंदिराची ॥६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

श्रीरामाचे मंदिर l  देखणे खुप सुंदर ll
त्यावर श्रद्धाही अपार l भोळ्या रामभक्तांची ॥७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

मंदिर मारुती, बसव,कल्लाप्पाचे l जोतिबा,माऊली,विठ्ठलाचे ll
दत्त,सिद्धीविनायकाचे l कृपा दुर्गामाता,लक्ष्मीची ॥८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

सप्ताह हनुमान जयंतीला l पारायण महाशिवरात्रीला ll
उधान भावभक्तीला l गोडी आहे अध्यात्माची ॥९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कलावतीआईं उपासना सुंदर | अनिरुद्धबापूंचा घुमतो गजर ॥
रोज अभंग,भजने मधूर I हरिविठ्ठल भक्तांची ॥१०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥


दसरा, गणपती मोठा सण l नाग,दिवाळीला फराळ छान ll
रामनवमीलाही मान l धमाल इथे उत्सवांची ॥११॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

शिवपुतळ्याचा आम्हा अभिमान l आंबेडकरांचे गुणगान ll
इथे मास्जिदेलाही मान l इथे घृणा जातधर्मभेदाची ॥१२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

साहित्यिकांची ही खाण l 'स्वामी'चे दिल्लीत झाले गुणगान ll
'श्रीमानयोगी'ही महान ll पद्मश्री रणजितदादांची ॥१३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

माधवीताईंची प्रित जिथे जडली l
तिथेच 'नाच ग घुमा'ही घडली ll
नारी शक्तीही किती रडली l वाचून सल वेदनांची ॥१४॥
गातो महती कोवाड नगरीची

गुरुजी पांडूरंग कुंभार l लेखनिक अक्षरही सुंदर ll
साहित्यातही त्यांची भर l असे खुप मोलाची ॥१५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

लेखक जाधव पांडूरंग l गाजली कांदबरी त्यांची 'भोग  ll
वक्तृत्वाचा जुळला योग lअसे जाण लेखणीची ॥१६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कवी बिर्जे रामदास l नवकवितांचा ध्यास ll
कादंबरी आहे खास l लेखिका पारुताईंची ॥१७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गाव आले सिनेमात l आनंद भरला मनात ll
अजूनही अनेकजणात l असे स्मृती भालूची ॥१८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

इथे आल्या मोठ्या विभूती l पावन झाली इथली माती ll
किती सांगू मी किर्ती l माझ्या या गावाची ॥१९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

अभिनेते नाना,निळू फुले |मंत्री,साहित्यिकही आले ll
कुमारगंधर्व,वसंतराव गाऊन गेले l आठवण येते त्या दिवसांची ॥२०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

इथे जूनी नाट्य परंपरा l अभिनयात आहे दरारा ll
लळीतालाही इथे थारा l किर्ती 'आदर्श प्रेक्षकांची'॥२१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

नेहमी सांस्कृतिक रेलचेल l खेळातही केली कमाल ll
असते कलेतही मोठी धमाल l इथल्या तरुणाईची ॥२२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

रणजित देसाई ग्रंथालय l आहे शिवनेरी वाचनालय ll
इथल्या बुद्धीचे खाद्यालय | ही श्रीमंती माझ्या गावाची ॥२३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

चंदगडी बोली गोड I सोबत प्रमाणतेची जोड ॥
नाही जिला कुठे तोड l अशी भाषा अभिमानाची ॥२४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

श्री हनुमान जूनी तालिम l गजबजून गेले नवे जीम ll
पैलवान जसे बलभीम l इथे उपासना शक्तीची  ॥२५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कोवाड बाजारपेठ l आहे नाव लई मोठं ll
दर गुरुवारी बाजारहट l सोय साऱ्या कर्यातीची ॥२६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

प्रसिद्ध इथली पुरीभाजी l पेढे, आम्लेट आणि भज्जी ll
रोज मिळते चायनिज ताजी l सोबत सोय दारु,मटणाची ॥२७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

डेअरी,पतसंस्था आणि बँका l दोन्ही शेतकरी संघांचा डंका ll
मदत मिळते राव आणि रंका l सोबत सेवा सोसायटीची ॥२८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

भव्य आरोग्य केंद्राची सेवा । पोलिस ठाण्याचीही हवा ॥
अनुभव एकदा तरी  घ्यावा | संकटात मदतीची ॥२९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पुढारी इथले सारे कर्तबगार l त्याला धडाडीची आहे धार ll
विकासाची आहे किनार l जाणिव असे कर्तव्याची ॥३०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

ग्रामपंचायत आहे मस्त l जागरुक इथले ग्रामस्थ ll
सदा कामात व्यस्त ll इथे चर्चा विकासाची  ॥ ३१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गावचा आहे मोठा अभिमान l जयवंत जाधव गातो गुणगान ll
ठेऊन लहानमोठ्यांचा मान ll चूकल्यास माफी सर्वांची ॥३२॥
गातो महती कोवाड नगरीची
 ॥धृ॥

        © जयवंत जाधव, कोवाड
        ता.चंदगड, जि. कोल्हापूर
         मोबाईल 9403463881

Saturday, July 25, 2020

मराठी साहित्य संमेलन बेळगुंदी येथे कवितावाचन करतांना ....

अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कांही क्षणचित्रे ...

बालकुमार साहित्य संमेलनात सन्मान

कोवाड मराठी साहित्य संमेलन २०१८ सोबत साहित्यिक सुनिलकुमार लवटे , सागर देशपांडे , भरमूआण्णा पाटील , राजेश पाटील , किरण ठाकूर , संग्रामसिंह कुप्पेकर इत्यादी .

कविता - सुर्य

.....🌅सुर्य 🌅

नवलाईची  गोष्ट  घडली
सुर्य जन्मला एक
भिमराया नाव त्याचं
लई  गुणी  लेक

पाह्यल त्यानं बसलेलं
दलितांना धक्कं
पाहून सार  त्याच्या डोळ्यात 
पाणी आलं चक्क

तवाच त्यानं ठरवलं 
मनाशीच  पक्क
मिळऊन देईन सर्वाना 
त्यांचे मूळ हक्क

मग त्यान पाहिलं नाही
तहान  आणि  भूक 
जिद्दीने तो शहाणा झाला
शिकून लई बुक

स्वतःच्याच हिम्मतीनं
लढा उभारला चक्क 
प्रेरणा अशी दिली  की
बोलू लागलं मुक्क

अजब  त्याच्या  कामानं
जग झाल थक्क 
'मानवतेचे' आदर्श असं
काम केलं  नेक

भले भले त्याच्या म्होरं
पडलेत  फिक्क
जगामध्ये उजेड फाकला
ह्योच सुर्य  एक
ह्योच सुर्य एक

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    जयवंत  जाधव,कोवाड
    ता चंदगड  जि कोल्हापूर 
    9403463881

कविता - वारी

वारी

आली चला वारी
गाठूया   पंढरी
भेटूया  मुरारी
           प्रेमरूपी

रंक आणि राव 
चोर आणि साव
सर्वां भक्तीभाव
            भरलेला

गळ्यामध्ये माळ
हातामध्ये टाळ
गंधाने  कपाळ
             सजलेले

भिमा चंद्राकृती
धुवुया  विकृती
सत्याची स्विकृती
             करण्याला

पाहु सारे संत
सावळा अनंत
मिटतील भ्रांत
            मनातील

ऐकू संत उक्ती
वाढो भाव भक्ती
मना मिळो शक्ती 
            सर्वांच्याच....

______जयवंत जाधव, वारी

आली चला वारी
गाठूया   पंढरी
भेटूया  मुरारी
           प्रेमरूपी

रंक आणि राव 
चोर आणि साव
सर्वां भक्तीभाव
            भरलेला

गळ्यामध्ये माळ
हातामध्ये टाळ
गंधाने  कपाळ
             सजलेले

भिमा चंद्राकृती
धुवुया  विकृती
सत्याची स्विकृती
             करण्याला

पाहु सारे संत
सावळा अनंत
मिटतील भ्रांत
            मनातील

ऐकू संत उक्ती
वाढो भाव भक्ती
मना मिळो शक्ती 
            सर्वांच्याच....

______जयवंत जाधव, कोवाड
           ता चंदगड जि कोल्हापूर
           मोबा. ९४०३४६३८८१
           ता चंदगड जि कोल्हापूर
           मोबा. ९४०३४६३८८१

कविता - ताम्रपर्णी

माझी नदी .....

    ताम्रपर्णी

थोरवी मोठी तुझी माता
शब्दही कमी गुण गाता 

माया कधी नाही आटली
तुझ्या जलाने शिवारं नटली

कधीही नाही खळखळ 
भले व्हावे ही तळमळ 

तू असते नेहमी शांत 
नाही कसली आम्हा भ्रांत

विरह कधी आला नाही 
वाहत राही बारमाही 

जल जीव खेळ खेळती 
लता वृक्षही काठावरती 

लाल माती वाहून येती 
पाणी 'ताम्र' याने होती 

कृपा असुदे  तुझी आणि
किर्ती पसरुदे कर्णोकर्णी 

नाव कोरतो सुवर्णानी 
'ताम्र पर्णी ' हो 'ताम्रपर्णी'
 
         ©जयवंत जाधव, कोवाड
         ता. चंदगड जि. कोलहापूर
         मोबाईल 9403463881

व्यंगचित्रे

व्यंगचित्रे

व्यंगचित्रे

व्यंगचित्रे

काहूर कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा ८ एप्रिल २०१८

होरपळ कविता संग्रह प्रकाशन सोहळा

व्यंगचित्र घराणेशाही

व्यंगचित्र दिवाळी अंक

व्यंगचित्र

व्यंगचित्र दिवाळी अंक

व्यंगचित्र भ्रष्टाचार

स्वामीकार रणजित देसाई यांचे जयवंत जाधव यांनी काढलेले चित्र

छ.शिवाजी महाराज यांचे जयवंत जाधव यांनी काढलेले तैलचित्र

वात्रटिका मार्मिक ठोसे १ ते ४

विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या वेळी तात्कालीक प्रसंगावर भाष्य करणाऱ्या व संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरलेल्या  माझ्या वात्रटिकांचा खजिना मार्मिक ठोसे या सदराखाली मी आपल्या समोर सादर करत आहे . . . .



१)
भारतात आहे लोकशाही 
बातमी निव्वळ फेक आहे.
जिकडे जावे तिकडे पहा
घराणेशाहीची मेख आहे.
२)
आलाच पाहिजे आलाच पाहिजे
जनतेची जोशात 'घोषणा ' आहे.
निवडणूकीनंतर लुटण्याची मात्र
नेत्यांच्या मनात 'वासना ' आहे.

३)
निवडणूकीच्या बाजारात
उमेदवारीचा जंगी सेल आहे.
पैशाअभावी तिकीटासाठी
सामान्य कार्यकर्ता फेल आहे.

४ )
मवाळ नाहीच कुणीही
नुसताच आहे  राडा. 
भाऊबंदकी उफाळली
मावळ असो वा माढा.

    ........जयवंत जाधव, कोवाड
             जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ५ ते ८

वात्रटिका
५ )
नामदारांच्या वारसांचा
'खास'दारकीचा हट्ट आहे.
पक्षापेक्षा राजकारण्यांचं
रक्ताशी नातं घट्ट आहे.

६ )
प्रेम वगैरे काही नाही 
घातली स्वार्थी 'गळ ' आहे.
आपल्यापेक्षा मोठा होईल
आतली खरी कळ आहे.


७ )
निष्ठेमध्ये लवचिकता
धोरणात थोडी फट आहे.
'एकाच' घरात 'प्रत्येकाचा'
'वेगळावेगळा' 'गट' आहे.

८ )
बेडूकरावांच्या स्वागताला
रंगीबेरंगी गुच्छ आहे.
तिकडे असता 'घाणेरडा'
ईकडे येताच 'स्वच्छ' आहे.

       ....... जयवंत जाधव,कोवाड
                जि. कोल्हापूर
                9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ९ ते ११

.....वात्रटिका

९)

आजोबा,मुलं आता नातू
निवड अगदी 'सार्थ ' आहे.
वंशपरंपरागत कधी राहुल
कधी 'आदित्य','पार्थ ' आहे.

१०)

'तरुणरक्त पाहिजे' ही मागणी त्यानी
कार्यकर्त्यांच्या तोंडी कोंबली आहे.
'तरुणरक्त फक्त तुमच्याच घरात?'
ही टिका त्यांना झोंबली आहे.

११)

पणजोबा पासुन आतापर्यंत
कायम यांचाच ' ठेका ' आहे..
खुर्चीवरच्या लोण्यावर डोळा
प्रत्येकजण इथे बोका आहे.

........ जयवंत जाधव, कोवाड.
         जि. कोल्हापूर
         9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे १२ ते १४

...... वात्रटिका


१२)

खड्डे भरलेल्या रस्त्यांना
भला मोठा 'टोल' आहे.
मुंबईतील पुलांच्या निधीला
खड्डया एवढा 'होल' आहे.

१३ )

कुणाचं बेगडी प्रेम तर
कुणाचं वैर खोटं आहे,
कधी यांच्यात 'धूमशान'
तर कधी साटंलोटं आहे.

१४ )

'आठवले' ते सांगतो 'जाणकारा'ना
इथे जनाधाराची 'अट' आहे.
नामदार होऊनही काम नाही
म्हणून यांचा पत्ता 'कट' आहे.


........ जयवंत जाधव, कोवाड.
          जि. कोल्हापूर
          9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे १५ ते १७

.... वात्रटिका


१५)

मनाला नसलं 'प्रिय' तरी 
*सॉफ्ट* हिंदुत्व *उधार* आहे.
'सत्तादेवी'च्यासाठी प्राप्तीसाठी
*गंगा* प्रवासाचा *आधार* आहे.

१६)

ठिकाण गाडीचं पक्कं नाही
*इंजिन* सध्या *ठप्प* आहे.
'मन'से काही सुचत नाही
म्हणून *राज* कारण *गप्प* आहे.

१७)

*राम* भरोसे    उ *दास*  तो
*उंबऱ्या* वर अडला आहे
*हिरव्या* कुरणी *निळ्या* आकाशी
*प्रकाश* नवा पडला आहे.


      ....... ©जयवंत जाधव, कोवाड.
              जि. कोल्हापूर.
              9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे १८ ते २०

....... *वात्रटिका*

१८)

*वाघा* सोबत *कोल्ह्यांचं* पटलं नाही.
बहुदा 'अर्धसत्य' आहे.
निष्ठेपेक्षा असते 'पद' *'अमोल'*
यात थोडं 'तथ्य' आहे.

  १९)

'जन *पळभर*  हाय हाय'
क्षणात पुन्हा *मोद* आहे.
*मनोहारी* क्षण रिता होता,
लगेच नवा *प्रमोद* आहे.

२०)

'कुट'निती नि 'मत'निती *मोदी*
'निरव *करंट*'  देत आहे.
लंडन कोर्टातून  तातडीचा
अटक *वारंट* येत आहे.

      .....©जयवंत जाधव, कोवाड.
              जि. कोल्हापूर.
              9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे २१ ते २३

*वात्रटिका*

 २१)

*विजय* मिळविणे, *रण* जित'णे
*मोहित* करणे 'डाव' आहे.
'रणांगणात' *दल* बदलूना
आला भलताच 'भाव' आहे .

२२)

" मै भी चौकीदार" *न मों* ची
देशात वाजते 'धून' आहे.
जुगलबंदीत रंग भरला
त्यात *रा गा* चीही 'ट्युन'  आहे.

२३)

आचार संहिते नंतरही
पुन्हा *हालचाल* होत आहे. 
एक एक मत डोळ्यासमोर
'आण्णा' *लोकपाल* येत आहे.


     ...©जयवंत जाधव, कोवाड
             जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे २४ ते २७

[20/3/2019, 3:15 PM] Jayvant Jadhav: ...... वात्रटिका

२४)

फाल्गुनचा डोंब, शिमग्याची बोंब
आरोपाची धुळवड 'रंगत' आहे
सेवेचे ढोंग, नम्रतेचे सोंग
समाजाची एकी 'भंगत' आहे.

२५ )

निवडणुकीच्या रणांगणात
उमेदवारीची 'धूम' आहे
डावलल्यास पक्षांतर किंवा
बंडखोरीची 'टूम' आहे.

२६)

'बेडकां'मुळेच बंडखोरीची
सगळ्याच पक्षाना 'ठेच ' आहे.
आयाराम की निष्ठावान हा
वेगळाच नवा 'पेच' आहे.

........ जयवंत जाधव, कोवाड.
          जि. कोल्हापूर
          9403463881
[20/3/2019, 9:52 PM] 
(कोल्हापूर स्पेशल)

२७)

*समरां'गणी   संजय* धनुष्यासह
'सतेज उद्धवाचे' *सारथ्य* आहे.
*धनंजया* साठी महादेवाचा *अमंल*
हे  *चंद्र* लिखित *महाभारत* आहे.

     ...... जयवंत जाधव,कोवाड.
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे २८ ते ३०

.... वात्रटिका

२८ )

काहींचा 'हालला'.काहींचा नाही
जो तो 'पाळणाच' *पळवत* आहे.
आपलं निघालं 'बिनकामाचं' म्हणून 
दुसऱ्याचं 'लेकरू' *खेळवत* आहे.

२९)

उमेदवारीच्या नावांची
जाहिर झाली *सुची* आहे.
अनेकांची चांदी तर
कांहींची झाली *गोची* आहे.

३०)

कृष्णा *आड* अमित *वाणी*--
"आता 'बजूर्गाना' *फाटा* आहे. "
'लाटे'वर चालणाऱ्याना मात्र
'तो' खुपणारा *काटा* आहे.

      ..... जयवंत जाधव, कोवाड
             जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ३१ ते ३३

.....वात्रटिका

३१)

'मत'लावणीच्या फडात कमळाबाईचा,
बडया बड्यावर 'डोळा' आहे.
नखरेल अदा नि 'संधी'वर फिदा असा
प्रत्येकजण 'मुजऱ्याला' 'गोळा' आहे.

३२)

निरव,लोकपाल,दहशतीचे आरोप
ज'रा फेल' तर काही 'संपवत' आहेत.
एक एक धागा 'सफाई'ने जूळवत
'ते' सत्तेचा गोफ 'गुंफवत' आहेत .

३३)

खालसा झाले 'राज'  घ'राणे'
जबर बसला *धक्का* आहे.
कोण आहे भूमिगत. तर कुणाचा
माघारीचा निर्णय *पक्का* आहे.

........ जयवंत जाधव, कोवाड
         जि. कोल्हापूर
         9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ३४ ते ३६

......वात्रटिका

३४)
बेताल वक्तव्यासाठी तर
मोठ्यांची इथे 'लाईन ' आहे.
"ब्र" काढण्यासाठीही इथे
सामान्यांना 'फाईन ' आहे.

३५)

यांच्या सारखाच त्यांचाही
जाहिरनाम्याचा 'कहर' आहे.
आश्वासनांच्या बागेला आता
आला नवा 'बहर' आहे

३६)

पाठीशी भक्कम एक'संघ'
अाणि बरीच त्यांच्यात 'एकी' आहे. 
यांच्यात सारे खुप खेकडे
आणि खरीच यांच्यात 'बेकी' आहे.


      ..... ©जयवंत जाधव, कोवाड
             जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ३७ ते ३९

......वात्रटिका

३७)

'बळी'राजासोबत असतो 'सदा'
पोकळ यांचा दावा आहे.
सत्ता मिळताच टांग मारणे
भाऊंचा स्वार्थी कावा आहे.

३८)

वरुन हल्ला, आतून डल्ला
जनतेला 'ही' भूल आहे.
आतून वासना सत्तेची आणि
वरुन सेवेची झुल आहे.

३९)

कोल्हापूरात अंबाबाईचा
'अवतार' अगदी विराट आहे.
साताऱ्यातील राजेंचा 'उदय'
आणि 'पावर' ही तऱ्हाट आहे.


.......... जयवंत जाधव, कोवाड
            जि. कोल्हापूर
            9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ४० ते ४२

.....वात्रटिका

४०)

नामांकन पत्रातून आम्हाला आता
त्यांची मत्ता 'कळणार' आहे.
कोटीं,अब्ज पाहून कांहीजण 'थक्क'
तर काहीजणांंची 'जळणार' आहे.
४१)

कोटी पटीने वाढणाऱ्या
संपतीवर 'हरकत' आहे.
जनतेलाही कळू दे फंडा
कशाने एवढी 'बरकत' आहे

४२)

पावसा सारखाच *अवकाळी*
आश्वासनांचा *जोर* आहे.
स्वातंत्र्यापासुन *गरिबी हटाव*
घोषणा खरंच *थोर* आहे.


      ..... जयवंत जाधव, कोवाड
            जि. कोल्हापूर
            9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ४३ ते ४५

......वात्रटिका

४३)

आपल्यावरील आरोपांची
नुसती झाकाझाकी आहे.
भाषणातून दुसऱ्यावर मात्र
सरळ ठोकाठोकी आहे.

४४)

बाबासाहेबांचे कर्तृत्व आणि
पूर्व पुण्याईचे *संचित* आहे.
गटबाजीने पोखरला रि *पब्लिक*
अजून सत्तेपासून *वंचित* आहे.



४५)

आपलं ठेऊन झाकून तो
दुसऱ्याच्या  *चुका* दावत आहे.
वड्यावरचं वांग्यावर आणि
आश्वासनाना  *थूका* लावत आहे.


    ..... जयवंत जाधव, कोवाड
          जि. कोल्हापूर
          9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ४६ ते ४९

.....वात्रटिका

४६)

पंधरा लाख नि बहात्तर हजार
निवडणूकीचा *जुमला* आहे.
विनोदी घोषणा ऐकून भारत
हसून हसून *दमला* आहे.
४७)

शब्दांची फक्त फेकाफेकी
नको तिथे *ताण* आहे.
कोणाचे आहे काम किती
मतदाराना *जाण* आहे.

४८)

व्यंगावर बोट ठेऊन
व्यंगाभोवती फिरत आहेत.
बगल देऊन मुद्याला
भावनेमध्ये शिरत आहेत.


      ..... जयवंत जाधव, कोवाड
             जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ४९ ते ५१

वात्रटिका....

४९)

रंगीबेरंगी खांद्यावर झेंडे
गल्लोगल्ली *फिरत* आहेत.
काळजालाही कळण्याआधी
काळीज अलगद *चिरत* आहेत.

५०)
पाच वर्षातून एकदा उफाळणारा
हा फक्त मतासाठी *पुळका* आहे
पैसा आणि भेटवस्तू मतदाराला
हा लोकशाहीला *विळखा* आहे.

५१)

करून 'साखर' पेरणी
'ऊस ' आता *उगवत* आहेत.
'जून्याच' घोषणांची अंडी
'नवीन' म्हणून *उबवत* आहेत.


.......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881
.

वात्रटिका मार्मिक ठोसे ५२ ते ५४

.... वात्रटिका


५२) 
कार्यकर्त्यांच्या खुशीखातर
मच्छी, मटण मागवत आहेत.
'देशी' वरचे कार्यकर्तेही आता
'विदेशी' वर भागवत आहेत.

५३)

निवडणूका होईपर्यंत त्यांचा
*विदेशी* वर 'तडका' आहे.
निवडणूकीनंतर मात्र जो तो
*देशी* ला सुद्धा 'कडका' आहे.

५४)

जेष्ठ कार्यकर्ते यांना,सटरफटर
यांचं शेंबडं पोरगंही *सायब* आहे. 
सत्तेपुढे प्रत्येकाचाच  इथे
'स्वाभिमान' सुद्धा *गायब* आहे.


........... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ५५ ते ५ ७

.... वात्रटिका


५५) 

कार्यकर्त्यांच्या खुशीखातर
मच्छी, मटण मागवत आहेत.
'देशी' वरचे कार्यकर्तेही आता
'विदेशी' वर भागवत आहेत.
५६)

निवडणूका होईपर्यंत त्यांचा
*विदेशी* वर 'तडका' आहे.
निवडणूकीनंतर मात्र जो तो
*देशी* ला सुद्धा 'कडका' आहे.

५७)

जेष्ठ कार्यकर्ते यांना सटरफटर
यांचं शेंबडं पोरगंही *सायब* आहे. 
सत्तेपुढे प्रत्येकाचाच  इथे
'स्वाभिमान' सुद्धा *गायब* आहे.


........... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ५८ ते ६०

.....वात्रटिका

५८)

हाताखालील कामकरी
मागं मागं सरत आहेत.
घङ्याळाचे काटेही
उलटे सुलटे फिरत आहेत.

५९)

जोपर्यंत होते त्यांच्या सोबत 
तोपर्यंत एकदम *थोर* आहे.
बाहेर पडताच साक्षात्कार झाला
'तो' आता मोठा *चोर* आहे.

६०)

राखून ठेवलेली खास अस्त्रे
भात्यात ठासून 'भरली' आहेत.
टिपावे कधी, कसे, "कुणाला "
केंव्हा पासुन 'हेरली' आहेत.

.......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ६१ ते ६३

......वात्रटिका

६१)

भावनेभोवती फिरू नका
असा जनतेचाच 'रेटा' आहे. 
'व्हिजन' नाहीच कुठलंही
यात देशाचाच 'तोटा' आहे.

६२)

दिखावूपणाचे वैर यांच्यात
हा राजकारणाचा 'खेळ' आहे.
नंतर मात्र एकमेकांशी त्यांचा
चांगलाच जमणार 'मेळ' आहे

६३)

एका घरातच अनेक पक्ष
हा न सुटणारा 'गुंता' आहे.
मतदारसुद्धा दोन्ही डगरीवर
ही नेत्यांही 'चिंता' आहे.


.......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ६४ ते ६६

....वात्रटिका

६४)

'दारु' म्हणू नका कुणी  तिला.
ती जालिम एक 'दवा ' आहे.
त्या वासाच्याच जोरावर सध्या
त्यांच्या विजयाची 'हवा ' आहे.


६५)
कुटुंबातील प्रत्येकजण
प्रचारात 'व्यस्त ' आहे.
मतदानापर्यंत कार्यकर्ता 'किंमती'
निकालानंतर 'स्वस्त' आहे.

६६)

पुढे पळा पुढे पळा
'घबाड' आता गावणार आहे.
चहापेक्षा किटली गरम
अशांचं आता फावणार आहे

.......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ६७ ते ७०

......वात्रटिका

६७)
मिठी मारुन 'आँखे मारना' असा
नेहमी यांना 'छंद ' आहे.
'चाँद पे खेती' नि 'आलू से सोना' सारखाच
'बहात्तर'लाही ' गंध' आहे.

६८)

त्यांच्यासारखीच यांचीही सुसाट
हिंदुत्वाची सुटली गाडी आहे.
कपाळी टिळा नि गळ्यात माळा
आणि ' ड्रेस' ऐवजी साडी आहे.

६९)

कोण कुठे कधी गुपित
बंद दाराआड 'भेटत' आहे.
राजकारणही फाल्गुना सारखं
अगदी रमरमून 'पेटत' आहे.

७०)

अंतराळातील 'विकास' देशाला
खरोखरच भावला आहे.
'इस्त्रो'लाही 'मुहुर्त' बरोबर
निवडणूकीतच (?)  गावला आहे.



       .......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ७१ ते ७५

....वात्रटिका


७१)
वाजली तर वाजणार अशी
त्यांची *गाजरा* ची *'पुंगी'* आहे.
घोषणापत्रातील आश्वासनही
त्यांच्यासारखेच  *'ढोंगी'* आहे

७२)

प्रचारात आरोपप्रत्यारोपाचा
सुरु झाला *थरार* आहे.
जनतेला मूर्ख बनवण्याचा 'त्यांच्यात'
आलिखित *करार* आहे.

७३)

एकीकडे स्ट्राईक तर
दुसरीकडेच *धक्का* आहे.
'तन' इथे  तर 'मन' तिकडे
इरादा त्यांचा *पक्का* आहे.

७४)

काहींचं धोरण एकदम *राईट*
तर काहीजणांचं *लेफ्ट* आहे.
काहीचं एकदम *कडक* तर
काहींचं एकदमच *सॉफ्ट* आहे.

७५)

देश हिताचे ज्यांच्या कडे
ठाम, भक्कम *धोरण* आहे.
त्याच पक्षाची संसदेवर *गुढी*
आणि विकासाचे *तोरण* आहे.



....©जयवंत गणपती जाधव,
     कोवाड ता.चंदगड जि.कोल्हापूर
      9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ७६ ते १००

नमस्कार,
   गेले २५ दिवस सुरू झालेली आणि *निवडणूक* हा एकच विषय असलेली माझ्या *वात्रटिकांची मालिका* 
    काहींना आवडल्या. काहीनी प्रेरणा दिली. त्यांचे मनःपूर्वक *आभार..


७६)

'राज'कारणात त्यांची द्विधा
आणि खुपच झाली 'घाई' आहे.
घड्याळाच्या हातासाठी त्यांच्या
बोटाला लागणार 'शाई' आहे.

७७)
एकीकडे डोळा तर 
दुसरीकडे 'नेम' आहे. 
दिसायला लोकसभा पण
विधानसभेचा 'गेम' आहे.

७८)


नट आणि नट्यांनी घेतली
राजकारणात 'उडी ' आहे.
नेत्यांची मात्र अभिनयात
अभि'नेत्यां'वरही  'कडी' आहे.

७९)

भाजपाचा खामोश 'शत्रु '
काँग्रेसचा झाला मित्र आहे.
यांच्यात काय नि त्यांच्यात काय
सर्वत्र एकच चित्र आहे.

८०)
( बेळगांव स्पेशल)

'मराठी आस्मिता' साठी लढायचा
लोकसभेचा 'लढा' आहे. 
आपापसात लढणे म्हणजे
हा 'एकीकरणाला'  तडा आहे.
८१)
( बेळगांव स्पेशल)

कमळाबाईना हिंदुत्वाची
बघू किती 'साथ' आहे.
निधर्मी जनता दलाचा किती
काँग्रेसला मिळणार 'हात' आहे.

८२)

कोण येणार कोण येणार
प्रत्येकजण गर्क आहे.
कट्टयावरच्या प्रत्येकाचा
वेगवेगळा तर्क आहे.

८३)

निवडणूकागणिक मतदानात
थोडी वाढ,थोडी घट आहे.
वाढल्यास चिडीचुप्प. नसल्यास
हा ईव्हीएम चा कट आहे.
८४)


एकात 'देव' दुसऱ्यात 'नर'
दोघांच्या नावात 'इंद्र' आहे.
एकाच्या डोक्यात 'राज्य' तर
दुसऱ्याच्या मनी 'केंद्र' आहे.

८५)

कार्यकर्त्यांच्या खिशात 
सध्या 'पैसे' खणाणत आहेत .
कार्यकर्त्यांच्या 'कॉकटेल'ने
नेत्यांचे *'धाबे'* दणाणत आहेत.

८६)


मतासाठी घिरट्या आकाशी
कावळ्यांसह *पक्षांचा* 'थवा' आहे.
'माया ममता' 'फुल' मुलायम त्याना
*आप* लेपणाचा *हात* 'हवा' आहे.

८७)

'नव्यांना संधी नि जुणे जाणार
आता नक्की बदल होणार आहे
आईबाबा ऐवजी आता त्यांचच
एक तरी पोरगं येणार आहे.
.
८८)

माघारी साठी ज्याची त्याची
कोटी कोटीची 'भाषा' आहे.
नाही नाही म्हटले तरी निदान
काही लाखांची 'आशा' आहे.

८९)
टक्केवारीत काम करणे
जडला त्याना 'आजार' आहे.
देशसेवेच्या नावाखाली
दलालांचा भरला 'बाजार' आहे.

९०)


कल्पवृक्षाचा विकास असा
एकाकडे  'करवत' आहे.
आणि संगोपनेचं पाणीही 
दुसरीकड़े  'जिरवत' आहे.

९१)

एक महिन्याचे काम आणि
पगार पाच *वर्ष* आहे. 
उत्पन्न वाढणार दसपट अशी
*नेतेगिरी* हा  परिस *स्पर्ष* आहे.

९२)


बुद्धांपासुन युद्धापर्यंत
चर्चेत एक एक ' मुद्दा 'आहे.
आपली बाजू लढण्यासाठी
तयार एक एक 'योद्धा ' आहे.

९३)


मूठीत गू आणि वरनं धु
अशी त्यांची निती आहे.
गोड बोलून खोड मोडतील
अशी थोडी भिती आहे.

९४)


'हाता'खालील कामकरी
मागंमागं सरत आहेत.
घङ्याळाचे काटेही
उलटेसुलटेे फिरत आहेत.

९५) .

कुठे कुठे लटका राग
कुठे दिखाऊ मेळ आहे.
एकीकडे सिंगल 'चहा '
दुसरीकडे  "भेळ " आहे.
९६)


बिनकामाच्या नेत्यांची पत 
स्वकर्मानेच घसरत आहे.
मतदारराजाही  मत द्यायला
जाणिवपूर्वक विसरत आहे.

९७)

नेत्यांच्या आदेशाने सध्या
बंडोबांचा बाण भात्यात आहे.
माघारीसाठी माहित नाही
किती जमा 'खात्यात' आहे.

९८)

'जख्खड' तरी तरुण तडफदार
डीजीटल वर त्यांची 'छबी' आहे.
राजकारणातील 'तारुण्य' राखण्यात
प्रत्येक नेत्याची वेगळी 'खुबी' आहे.

९९)

जाती धर्माच्या राजकारणात 
विकासाला ठेंगा दावत आहेत.
वेगवेगळ्या रंगा सोबत नेते
सगळ्याना 'चूना' लावत आहेत.
*१००)*

*मतदान* मी करणारच
मौल्यवान माझे *मत* आहे.
*लोकशाही* च्या पिकवाढीला
ते *पोषक* असे *खत* आहे.

.......... © *जयवंत जाधव, कोवाड*
              जि. कोल्हापूर
             9403463881