खाऊ छकुल्याचा
छुकल्या माझ्या भाऊचा
डब्बा घेतलाखाऊचा
बाळकडू ते कडू किती
तरी सुद्धा चाटून खाती
कडधान्ये दळली बारीक
शिजवले सोबत खारीक
उगळले औषध चाटण
फस्तच करतो चाटून
छकुल्याचा खाऊ मजेदार
गोड आणि चविष्ट फार
गोड मधुर बदाम दुध
चाखून खातो मध शुद्ध
किती हे प्रकार खाऊचे
साऱ्यात भारी, दुध आईचे
___ जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा