शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १६० १६१

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१६०)

वचन आणि जाहिरनाम्यात सांगा
घोषणा कोणत्या नव्या आहेत?
दुसरं काहीच नको आता फक्त
तुमच्यासारख्या सुविधा हव्या आहेत.

१६१)

स्वतःचा पगार, पेन्शन वाढवून घ्यायची 
आमदार खासदारांवर बंदी हवी आहे.
किंवा शेतकरी कामकारांनाही
तशी संविधानातच संधी हवी आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा