*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१९७)
आतल्या गोटातून आली
उघड गुपित वार्ता आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाराच.
भ्रष्टाचाराचा कर्ता आहे.
१९८)
येणार तर मीच येणार अशी
त्याना एकदम खात्री आहे.
कारण अजून फक्त 'बांधणी' होती
फिनिशिग शेवटच्या रात्री आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा