*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१११)
लोण्यासाठी दोन बोके
जिंकून सुद्धा हरले आहेत
दोघांच्या भांडणातील लाभासाठी
तिसऱ्यानंच डाव पेरले आहेत.
११२)
त्यांचही बरोबर यांचही बरोबर
बहुतेक मतदारच चुकला आहे.
संधी गेल्यावर मग म्हणतील
अरेरे..चान्स आपला हुकला आहे.
११३)
दैवानं भरभरुन दिलेलं
बहुमत यांच्या गाठीला आहे.
कर्मानं ठरतील दळभद्री ते
पण जनता मात्र वेठीला आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा