शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १६२ १६३

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१६२)

ऑक्टोबर हिट, प्रचाराचा पारा
रोज रोज वर चढत आहे.
नेत्यांच्या आश्वासनांचा पतंगही 
'वाऱ्या'वर उंच उडत आहे.

१६३)

प्रगत महाराष्ट्र फक्त नावालाच 
अजून बराच भाग भकास आहे.
जनतेपेक्षा अनेक नेत्यांचाच 
झाला खुपच मोठा विकास आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा