*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२०३)
निकालात कळणार कोण आला
कुणाला बसला फटका आहे.
अनेकांचा ठरणार फुसका बार
एकटाच मारणार चटका आहे.
२०४ )
कोण येणार कोण येणार
रंगला गप्पांचा कट्टा आहे.
अंदाज आणि छोट्या पैजा
कुठे मोठमोठा सट्टा आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment