शनिवार, २५ जुलै, २०२०

कविता - सुर्य

🌅        सुर्य         🌅

नवलाईची  गोष्ट  घडली
सुर्य जन्मला एक
भिमराया नाव त्याचं
लई  गुणी  लेक

पाह्यल त्यानं बसलेलं
दलितांना धक्कं
पाहून सार  त्याच्या डोळ्यात 
पाणी आलं चक्क

तवाच त्यानं ठरवलं 
मनाशीच  पक्क
मिळऊन देईन सर्वाना 
त्यांचे मूळ हक्क

मग त्यान पाहिलं नाही
तहान  आणि  भूक 
जिद्दीने तो शहाणा झाला
शिकून लई बुक

स्वतःच्याच हिम्मतीनं
लढा उभारला चक्क 
प्रेरणा अशी दिली  की
बोलू लागलं मुक्क

अजब  त्याच्या  कामानं
जग झाल थक्क 
'मानवतेचे' आदर्श असं
काम केलं  नेक

भले भले त्याच्या म्होरं
पडलेत  फिक्क
जगामध्ये उजेड फाकला
ह्योच सुर्य  एक
ह्योच सुर्य एक

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    जयवंत  जाधव,कोवाड
    ता चंदगड  जि कोल्हापूर 
    9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा