शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १५४ १५५

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१५४ )
वचपा काढण्यासाठी त्यानी
अचूक वेळ 'साधली ' आहे.
एकाचा कुंकू दुसऱ्याशी संसार
निती याना 'बाधली ' आहे.

१५५)

निवडणूकीच्या रणांगणात
बंडखोरांचीच 'बाजी' आहे.
खोका आणि पेटी मिळताच
माघारीसाठी 'राजी' आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा