शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १७८ १७९

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१७८)

'मोठा' बनण्यासाठी 'भाऊ' भावाची
बंडखोरांकरवी चांगली जिरवत आहे.
'तो मी नव्हेच' असं वर वर म्हणत
आतून पाठबळाची रसद पुरवत आहे.
१७९)

निकालापर्यंत तरी राहणार एकी
नंतर घडी विस्कटणार आहे.
एक एक वजनदार खात्यासाठी
नक्की बोलणी फिस्कटणार आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा