*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१८६)
अजूनही सुरु आहे पळवापळवी
पळपुट्याना अंथरल्या पायघड्या आहेत.
'खोबरं तिकडं चांगभल' करणाऱ्यांच्या
खोबऱ्यासाठी उड्यावर उड्या आहेत.
१८७)
आपलं ठेऊन झाकून
दुसऱ्याचा पोल खोलत आहेत.
संतानाही लाजवेल असे
ते खुपच साजूक बोलत आहेत..
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा