शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १९९ २००

मार्मिक ठोसे

१९९)
कुणाची ओहोटी कुणाची भरती
कुणाची त्सुनामी लाट आहे.
कुणाची चुकणार, कुणाला मुकणार
सत्तेची बिकट वाट आहे.

२००)

गहू एकीकडे उखळ दुसरीकडे
मनातल्या मनात कांडले जातात
कुठे खिर आणि कुठे मचमच
उगाच अंदाज मांडले जातात.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा