*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१७६)
कुणाचा दर अगदी किरकोळ
तर कुणाचा दर घावूक आहे.
कोण कुणाला विकला गेला
सामान्य जनतेला ठावूक आहे.
१७७)
कोट्यावधी घेऊन,मी नाही त्यातली
वर उजळ माथ्याने मिरवत आहेत.
चिरीमिरी देऊन कार्यकर्त्याना
दिवसभर ऊनात फिरवत आहेत.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा