Friday, July 31, 2020

कविता - दुष्काळ

दुष्काळ
पिक नाही पाणी नाही
भयान ऊन पेटलेले
दुष्काळाच्या झळामध्ये
लोक सारे विटलेले

करुन काबाड कष्ट
रक्त सारे आटलेले
वाळलेले अंग आणि
वस्त्र सुद्धा फाटलेले

मुलेबाळे उपाशीच
मरणाला टेकलेले
बिचारे वाळून गेले
कुणीतरी पुटपुटले

आ वासुन गुरे ढोरे
डोळे थोडे मिटलेले
चारा नाही पाणी नाही
कसे तरी टिकलेले

आठवून सारे काही
कंठ त्याचे दाटलेले
संसार सारे पोरके झाले
स्वर्गासम नटलेले

अजूनही शांत नाही
आभाळ हे पेटलेले
वारे कधी शांत होणार
आगीसम सुटलेले

ढग केव्हा जमा होतील
जीवन थेंब साठलेले
पुन्हा कधी उजाळेल
नशीब हे फुटलेले


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881
,

No comments:

Post a Comment