Friday, July 24, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे १२१ ते १२३

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
 
१२१)

अचूक वेध, अचूक वेळ साधणे
हीच यशाची खरी *शिडी* आहे.
जूनाच गुन्हा आणि नोंदणी पुन्हा
आता सोबतीलाही *इडी* आहे.

१२२)

तेल पळवले पणतीले तरीही
अजून जळते *वात* आहे.
टुकटुक घडयाळाच्या मदतीला
तो नेहमीचाच *'हात* आहे.

१२३)

*'नाना* कळा *फडणविस* म्हणजे
पेशवाईतले *धूर्त* कारभारी..
*अजिंक्यतारा* गेला भेटीला
*शनिवारवाड्याच्या* दरबारी....

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment