शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

कविता - भेद

भेद

चार चाकी गाड्यांना
रस्ता पसरट
पादचारी चालताना
होते कसरत

एसी बुलेट ट्रेन
रावांना विमान
गरिबांच्या एसटीकडे
मूळी नाही ध्यान

झोपड्या साऱ्या पाडून
बांधले टॉवर
पिण्या नाही पाणी आम्हा
श्रीमंताना शॉवर

खाजगी कंपन्याना
देऊन मलिदा
सरकारी शाळांच्याच
केल्या कमी सुविधा

वायफाय नेट कशा
पोटा नाही अन्न
सेझच्या नावाने माझी
लाटली जमीन


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा