Friday, July 24, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे २१६ २१७

*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )

२१६)

आतून वळवळ सत्तेसाठी त्यांची
वर वर कळवळ्याचा मुखवटा आहे.
चॅनेल वाल्यांच्या बाईटसाठीच बांधावर 
पूर आणि अवकाळीसाठीचा दुखवटा आहे.
२१७)

ऐंशी टक्के समाजकारण नि म्हणे
२०% राजकारणाचं थोरण आहे.
प्रत्यक्ष त्यांचं शंभर टक्के राजकारण
म्हणून  जनतेचच आता मरण आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment