शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १७० १७१

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१७०)

गुडघ्याला बाशिंग बांधलेल्याचीही
गल्लीबोळात वरात आहे.
मतांचा आशीर्वाद घेण्यासाठी तो
येतोय प्रत्येक घरात आहे.
१७१)

सभेसाठी हजर,मजूरीचा आकडा
सध्या हजाराच्या घरात आहे.
पंधरा दिवस रोजगार हमखास
आणि चैनीसुद्धा जोरात आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा