शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

कविता - अभागी

अभागी

ऊसाच्या बुडक्यावर
घाव कोयत्याचा
वेगळं करायला अगदी मूळापासून
सोलताना पाला, छाटताना वाडे धडावेगळे
काढतात पिळून
चरख्यात
गोड रसासाठी, साखरेसाठी
ऊसाच्या वेदनेची पर्वा न करता .
ऐकू येत नाहीत
ऊसाच्या आर्त किंकाळ्या
बहिरे झालेत कान
बधीर झालंय मन
पोटासाठी
'ऊस' आणि माझे 'शिक्षण'
काय वेगळे?
मूळापासुन तोडणारे हेच
माझे गबळी मायबाप
मी अभागी
गबाळ्याचं
पोर


   जयवंत जाधव, कोवाड
   ता.चंदगड जि. कोल्हापूर
   मो .9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा