शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १८८ १८९

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१८८)

वंशपरंपरेने नेते पाळणे हे
आपलेच खरे पातक आहे.
व्यक्ति निष्ठा राजकारणात
लोकशाहीसाठी घातक आहे.

१८९ )

उघडा डोळे आणि बघा नीट
आपला उमेदवार कसा आहे.
निवडा तुम्ही त्यालाच ज्याचा
विकास कामात  ठसा आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा