*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
११९ )
कुणाच्या मनाचा ना थांगपत्ता
कळेना कुणीकडे कल आहे.
नवनवे डावपेच आणि रंगतोय
त्यांच्यात षढयंत्राचा खल आहे.
१२०)
नक्कीच कुठेतरी धग असणार
म्हणून दिसतोय धूर आहे.
ठेवणीतल्या डावपेचाने
बदलतोय राजकारणाचा नूर आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा