*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१६४)
पाठींब्याबाबत कार्यकर्ते अंधारात
नेत्यांना 'पाकिटांचं' 'गाजर' आहे.
कार्यकर्त्यांची मात्र प्रचारात दांडी
फक्त नेताच प्रचारात 'हजर' आहे.
१६५)
प्रचारासाठी सर्व नेत्यांचे आता
जुन्या आरोपांचे सर्चिग आहे.
तू माझं काढलास मी तुझं काढतो
असे एकमेकांला टॉर्चिग आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा