शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे - १४६ १४७

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१४६)

देव इंद्राची स्वकियांवरच आता
नजर थोडी तिरकी आहे.
'एक' अ'नाथ' बाळाला 'खडस'वणारी
जणू सावत्रआईच बेरकी आहे.

१४७)

कामाचा तर पत्ताच नाही
केवळ भाषणं मोठीच्या मोठी आहेत.
काल हजारात असणाऱ्यांची उड्डाणे
आज मात्र कोटीच्या कोटीत आहेत

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा