शुक्रवार, २४ जुलै, २०२०

बालकविता - सोनूची जत्रा

बालकविता _ 
  सोनूची जत्रा

सोनू निघाला जत्रेला
घेऊन सोबत मित्राला

घालून रंगीत कपडे
चालत निघाले बापडे

दुकाने पाहताच हसले
दोघंही गर्दीत घुसले

गर्दीत जाता चेंगरून
दोघंही गेले गांगारून

खेळणं घेणार कशांचे
पाकिट हरवलं पैशांचे

दुकान पाहुन खायचे
सारं खावंसं व्हायचे

जेंव्हा मंदिरी गेले दोघेच
मम्मी पप्पा दिसले मागेच

दोघांना मग आला हुरुप
घेतली खेळणी, खाऊ खुप

                जयवंत जाधव, कोवाड
                मोबाईल 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा