*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१६६)
प्रत्येक वेळा गंडवणारी
नेत्यांची शक्कल महान आहे.
दारु मटणात मतदाराची
अक्कलसुद्धा गहान आहे.
१६७)
चिंतेचे नुसते नाटक त्यांचे
म्हणे लोकशाही धोक्यात आहे.
आपल्या घराण्यातच सत्ता ठेवणे
एवढच त्यांच्या डोक्यात आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment