शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १३६ १३७

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१३६ )

जेष्ठांना डावलून युवराजांचा
अभिषेक करुन झाला आहे.
युवकांना मागे सारुन दुसरीकडे
'म्हातारा'ही 'तरुण' झाला आहे.

१३७)

आयारामना संधी मिळण्याची
शंभर टक्के खात्री आहे
निष्ठावंत मात्र 'कांही' वेटींगवर
'काहीं'च्या उमेदवारीला कात्री आहे.


         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा