Wednesday, July 15, 2020

साहित्यिक जयवंत जाधव,कोवाड

 
कवी जयवंत जाधव हे एक महाराष्ट्रातील एक प्रतिभाशाली कवी आणि प्रसिद्ध कथाकार म्हणून परिचित आहेत . त्यांचे जन्मगाव कोवाड ता चंदगड जि. कोल्हापूर असून व्यवसायाने प्राथमिक शिक्षक आहेत
    त्यांचे होरपळ ( २०१६ ) व काहूर (२०१८ ) हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध आहेत . त्यांच्या कथा " कौल " या कथा संग्रहातून प्रसिद्ध होत आहेत . त्यांनी लिहिलेल्या वात्रटिका, कविता बालकविता, व्यंगचित्रे, चित्रे लोकमत पुण्यनगरी सकाळ पुढारी तरुण भारत या लोकप्रिय वर्तमान पत्रातून व दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली आहेत . त्यांच्या वात्रटिका या अनेक दिवाळी अंक, दै .पुढारी यातून " मार्मिक ठोसे " या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत . त्यांचा एक स्वतंत्र संग्रह " मार्मिक ठोसे " नावाने प्रकाशित होत आहे .
    ते एक उत्तम चित्रकार असुन त्यांची कांही व्यंगचित्रेही विविध अंकातून व सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाली आहेत .
     अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा, मराठी साहित्य संमेलन कडोली, आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन बेळगाव, मराठी साहित्य संमेलन बेळगुंदी यासारख्या अनेक व्यासपीठावर त्यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले आहे ..

8 comments:

  1. अभिमानास्पद ...

    ReplyDelete