Friday, July 24, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे २०७ २०८

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

२०७)

अपक्षांच्या पाठिंंब्यासाठी
उडणार आता झुंबड आहे.
पद आणि पैशांनी अपक्षांची
काठोकाठ भरणार तुंबड आहे.
२०८)

काठावरच्या बहुमताशिवाय
राजकारणात थ्रिल घडत नाही.
तळ्यात मळ्यात सदस्यांचेही
अर्थ'पूर्ण  'वजन ' वाढत नाही.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment