*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१५२)
स्वतःची भरभराट करुन घेण्यात
इथला प्रत्येक नेता बेरका आहे.
कर भरून प्रामाणिक करदाता मात्र
झाला विकासापासुन पोरका आहे.
१५३)
एकदा निवडून आले तरी
त्यांचा भत्ता अगदी लाखात आहे.
पुन्हा पडले तरी पेन्शन नि
त्यांचा रुबाब नेहमी झोकात आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा