Monday, August 3, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे २४४,२४५

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

२४४)
खाबुगिरिवाल्यांना कोरोना म्हणजे
आयतेच मिळालेले नवे कुरण आहे.
तापल्या तव्यावर भाजताहेत पोळ्या
जनता मात्र वरवंट्याखालचे पुरण आहे .

२४५)
टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना
लॉकडाऊन नामी संधी आहे .
हातावरच्या पोटावर लादलेली
एक जाणिवपूर्वक मंदी आहे

२४६)
बाराआणे खोटा चारआणे खरा
कोरोना  एक रुपयाचा बंदा आहे
चारआणे सेवा बाराआणे मेवा
पांढऱ्या वेषातील काळा धंदा आहे .

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

2 comments: