*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१९४)
नागरी सुविधा मागणे आता फक्त
मतदानापर्यंतच आपल्या हाती आहे.
मतदानानंतर त्यांच्या मनमानीचे
भोग भोगणे आमच्या माथी आहे.
१९५)
मतदानासाठीच्या मोठ्या 'घबाडा'तील
याचाही 'पाकिटा'पुरता हिस्सा आहे.
चारपाच बकऱ्यांतील एकदोन तुकडे
आणि वाटीभरच दारू नि रस्सा आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा