*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१२४)
कोट्याधीश कलंकित अशांचे
प्रत्येक पक्षात 'प्रस्थ ' आहे.
निवडणूकीपुरती उधळण आणि
पाच वर्ष सर्वच 'फस्त' आहे.
१२५)
नेत्यांची साऱ्या आतून मैत्री
कार्यकर्त्यांत मात्र वैर आहे.
विचारांना विरोध असावा
मात्र 'खुन्नस ' धरणे गैर आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment