शुक्रवार, २४ जुलै, २०२०

बालकविता - पावसात

बालकविता
पावसात...

घोंघावणारा आला मोठा वारा 
आला खुप वेगात
जसा खूप रागात
तशी पळे सोनी, जणू शर्यत दोघांत 

कडकडणारी वीज आकाशी
कशी आली गर्जत
किती तेज वाजत
तरीही सोनी कधी,नाही धजत

रिमझिम रिमझिम पाऊस आला
आलाय बरसत
नि गेला पसरत
आणि सोनी झाली चिंब, खुप हर्षत

खळखळ पाणी हिरव्या रानी
झुळझुळ वाहतं
खळखळ वाहतं
त्यात छोटी सोनी बघा आली नाचत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा