चीन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माझी कविता ....
चायना
वस्तू इलेक्ट्रिक
नि इलेक्ट्रॉनिक
सण याशिवाय साजरा होईना
सर्वाची आवड चायना ..॥१॥
दिसण्यातही मस्त
दरातही खुप स्वस्त
मूल दुसरं खेळणं पाहिना
खुप मोहक वस्तू चायना .
॥२॥
पाहून आपला फायदा
विचार करुनि दहादा
देशी वस्तू कुणीच घेईना
सर्वांना भूलविते चायना . ॥३॥
देशाचा होतोय तोटा
त्यात आपलाही वाटा
हे कुणीच समजून घेईना
अशाने मोठी झाली चायना ....॥४॥
आपली सारी 'रक्कम'
मात्र ते झाले 'भक्कम'
आता विकसित देशात गणना
लई तोऱ्यात हाय तो चायना .॥५॥
पैशांचा आलाय माज
आम्हा दाखवतो आज
जूनी खोड त्यांची ती जाईना
आपला छुपा शत्रु चायना ....॥६॥
खुपच हाय तो कडवा
नेहमी आपल्या आडवा
' युनो ' धोरण सक्सेस होईना
परदेशात *नालायक* चायना ...॥७॥
अस्त्रे शस्त्रे जरी त्यांची
सारी रसद मात्र आमची
*आमचे शत्रु आम्हीच हाय ना ?*
कशा पाहिजे सैनिक चायना ? ॥८॥
सीमेवर आपला भाऊ
नका *'शहीद'* होऊ देऊ
फायदा कमी का होईना
घ्यायची राहिली राहिना
पण घेऊ नका तुम्ही चायना
पण *घेऊ नका तुम्ही चायना* ...॥९॥
© *जयवंत जाधव*, कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल. 9403463881
🇱🇺🇱🇺🇱🇺🇱🇺🇱🇺🇱🇺🇱🇺
No comments:
Post a Comment