🌱वृक्ष संवर्धन🌱
वृक्ष छान दिसावा
गार वारा असावा
क्षणभर विसावा
सावलीत ॥१॥
आस्वाद देतो फळ
सुगंध देते फुल
रक्षण करी मूळ
या मातीचे ॥२॥
नका होऊ कृतघ्न
स्वार्थामध्येच मग्न
जीवनी येते विघ्न
रोगांचेच ॥३॥
सांभाळू सारे वृक्ष
राहू नेहमी दक्ष
प्रदुषणातून मोक्ष
मिळो आम्हा ॥४॥
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
जयवंत जाधव , कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल ९४०३४६३८८१
No comments:
Post a Comment