युवा नेतृत्वा
श्रम टाळून क्रम पाहिला भ्रम असा तू ठेवू नको
मर्म सांगतो कर्म कर तू धर्म सेवेचा सोडू नको
मान मिळतो जाण जरा तू शान वाढविता देशाची
छान असुदे घाण नसुदे भान असो या नितीची
वल्ली जमवून बोली मतांची हल्लीची रित टाळ आणि
गल्लीपासुन दिल्लीपर्यंत किल्ली सत्तेची घे तू झणी
सत्ता मिळता आता पुन्हा तू कित्ता पूर्वीचा गिरवू नको
भत्ता घेऊन मत्ता वाढता पत्ता तुझा तू हरवू नको
दर्या आणि सुर्यासारखे कार्य भव्य नि दिव्य असो
शौर्य आणि धैर्य जसे की मौर्य राजवट सुखी असो
फायदे पाहून वायदे देऊन कायदे चुकीचे करू नको
भावांसाठी आणि रावांसाठी गावा वाऱ्यावर सोडू नको
गावा वाऱ्यावर सोडू नको
जयवंत जाधव,कोवाड
ता. चंदगड जि.कोल्हापूर
मोबाईल 9403463881
No comments:
Post a Comment