"महासत्ता"
खरचं सांगतो मी तुम्हाला थोडं ऐका माझं राव
म्हणे भारत माझा महासत्ता होणार वाढणार आमचा भाव II धृ II
अंबानींची श्रीमंती
जगात होणार नाव
गरिबाला कोण विचारील ?
भलतच काय तरी राव
भारत माझा महासत्ता होणार वाढणार आमचा भाव II 1 II
मुंबई दिल्ली कोलकत्ता
स्मार्ट सिटींच नाव
गावाकड कोण बघतय?
भलतच काय तरी राव
भारत माझा महासत्ता होणार वाढणार आमचा भाव II २ II
पंचतारांकित हॉटेलात
श्रीमंत मारती ताव
आमच्या भूकेल्या पोटाला
गाड्यावरचा पाव
भारत माझा महासत्ता होणार वाढणार आमचा भाव II ३ II
शहरामध्ये घेती पहा
एसी बुलेट ट्रेन धाव
तुम्ही आम्ही गाठायच
आपल्या 'वडाप'ने गाव
भारत माझा महासत्ता होणार वाढणार आमचा भाव II ४II
असंख्य कोटी नेत्यांचे
त्यांची स्विस बँकेत धाव
जनधन च्या निमित्ताने
बँकेत आमचं 'फक्त नाव'
भारत माझा महासत्ता होणार वाढणार आमचा भाव II ५II
कोट्यावधीची कर्जे घेऊन
देश सोडती 'राव '
हजाराला भिऊन बळीराजा
घेतोय फासाकडे धाव
म्हणे भारत माझा महासत्ता होणार वाढणार आमचा भाव II ६II
जयवंत जाधव, कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल ९४०३४६३८८१
No comments:
Post a Comment