शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे - २३८...

*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )

२३८)

'आओ जावो घर तुम्हारा.' असं
आपण घरीसुद्धा पाळत नाही.
भारतातच का असे असावे
खरंच, धोरण काही कळत नाही.

२३९)

आपल्या घरात नि रेशनकार्डवर
परके कुणीही  चालत नाहीत. 
भारतही आपले एक घरच तरीही
यावर कुणीच काही  बोलत नाहीत.

२४०)

विरोध आणि समर्थन आंदोलनात
निव्वळ राजकारण दिसते आहे.
'विवेक कमी, अज्ञान जास्त' अशाने
सामाजिक वातावरण नासते आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा