Friday, July 24, 2020

कविता - ग्लोबल वॉर्मिंग


ग्लोबल वॉर्मिंग

कुणीतरी म्हणायचं,
'जग बुडणारं '...
ऐकून हे बालपणी
मी खुप भिणारं..
          
वाटू लागे,'आता माझे
घर बुडणारं '...
ज्याच्या त्याच्या अंगणात
पाणी भरणारं..

दिसू लागे बुडताना
मूक जनावर..
माणसांची तरंगती
प्रेतं पाण्यावर..

अनामिक एक भिती
बिंबे मनावर.
'खोटे स्वप्न' वाटे मग
येता भानावर.

'खरचं असं झालं तर
काय करणार ? '
जर तर काही नाही
असच होणार.. !

म्हणू नका,' बोलू नको
अशुभ वाटणारं '
खोटं नाही, खरं आहे,
'जग बुडणार. '

'भ्रामक' या सुखासाठी
गरजा  भरपूरं..
फ्रीज,एसी, हरितगृहे
यांचा मोठा वापर..

कारखाने, वाहनांचा
धूर भरपूरं...
एसओ टू , सीओ टू
मिथेनही फार..

विस्तारली गावे सारी
किती भरभर...
आकसली सारी 'वने '
लागे घरघर...

पूर्वी किती होती सांगा
पृथ्वी गार गार...
तापमान वाढतंय
आता भारभार...

वितळता ध्रुवीय बर्फ
पाणी वाढणारं..
वाढलेल्या पातळीने
'जग बुडणारं '

शेवटची तुम्हा देतो
एकच   ' वॉर्निग '
रोखून  धरा   तुम्ही हे
ग्लोबल वॉर्मिंग...
रोखून  धरा   तुम्ही हे
*ग्लोबल वॉर्मिंग...*

   
.... *जयवंत जाधव* , कोवाड
        जि. कोल्हापूर
       9403463881

🌞🌞🌞🌎🌞🌞🌞
माझ्या *होरपळ*(२०१६ )  या 'काव्यसंग्रहा'तून *....*

No comments:

Post a Comment