*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२३५ )
कर्ज काढून थकविणाऱ्या लबाडानांच
कर्जमाफी पुन्हा पुन्हा आहे.
कर्ज फेडणारे नि न काढणारेच वंचित
सांगा त्यांचा काय गुन्हा आहे.
२३६)
सातबारा कोरा हा उपाय नाही
त्याचे 'लाभार्थी ' ठराविकच बोके आहेत.
खऱ्या गरिबांना वंचित ठेवणारे
अर्थकारणातील खरे धोके आहेत.
२३७)
ठराविक अनुदान, योग्य हमीभाव
प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना हवा आहे.
आत्महत्या आणि नैराशावर हाच
खरा जालिम रामबाण दवा आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment