बालकविता -बडाईखोर सोनू
सोनू म्हणजे धाडसाचं
आहेच दुसरं नाव
बडाईखोर सोनू नेहमी
भलताच मारतो भाव ॥ धृ॥
हँव करीन तँव करीन
नेहमीच मारतो भाव
बडाईखोर सोनूचा नसतो
कधी बोलण्यात ठाव ॥१॥
शंभरपैकी काढीन म्हणतो
अख्खे एकशे दहा टक्के
सारीकडे मिरवत म्हणतो
माझे गणित खुप पक्के ॥२॥
इतिहासातील साऱ्या व्यक्ती
म्हणे जातात त्याला भेटून
म्हणतो देश पाहून आलो
सारेच जगातले एकूण ॥३॥
उसेन बोल्ट मागे राहिल
एवढया वेगात मी पळतो
बॉलिंग जेंव्हा करतो मी
विराटही अडखळत खेळतो ॥४॥
साऱ्या खेळातील खेळाडूंचे
उधळून टाकीन डाव
पेपर, टीव्ही , मिडीयावर म्हणे
झळकेल याचेच नाव ॥५॥
जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881
No comments:
Post a Comment