बालकविता -
फुलासारखी सोनी
फुला सारखीच आहे
सोनी नावाची मुलगी
आवडतात तिला फुले
फुलांशी तिची सलगी
कुरवाळत बसते ती
छान शेवंतीचे फुल
दगडी फुलांचे तिचे
कानात डूलते डूल
गुलाब तिला आवडे
टपोरे आणि गुलाबी
गोबरे गाल सोनीचे
जणू गुलाबाची छबी
रोज नवी फॅशन नि
नवा केसांचा खोपा
कधी लांब वेणीवर
पिवळा छान चाफा
अबोली नि घुरटीचा
बनविते लांब गजरा
सोनीचा चेहरा तेंव्हा
फुलासारखा साजरा
फुले सुगंधी सुंदर
तसे छबिले तिचे रुप
छकुली गोड सोनी ती
सर्वाना आवडते खुप
जयवंत जाधव, कोवाड
मोबाईल _9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा