शुक्रवार, २४ जुलै, २०२०

बालकविता - पिकनिक सोनीची

बालकविता -पिकनिक सोनीची
एकदा आले मनात
सोनी गेली रानात

गंमत वाटे रानाला
पाहून छोट्या सोनीला
 
वाऱ्याने झाडे डोलवली
झाडांनी फुले फुलवली

टपकताच फळे खाली
सोनी ती हरकून गेली

फुले पाहिली, फळे खाल्ली
अशी पिकनिक सोनीची झाली

     जयवंत जाधव, कोवाड
    मोबा.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा