बालकविता
प्राणी
कुत्रा आमचा काळू
चला म्हणतो खेळू
रागीष्ट जरी थोडा
किती पळतो खुप
चोर पकडायचा
त्याला भारी हुरुप
आमची मनी म्याँऊ
रोज दुध तिचे खाऊ
किती छान देखणी
पण खुप आळशी
खेळत ती बसते
आपल्याच बाळाशी
देखणी आमची गाय
आम्हा साऱ्यांची माय
गोठ्यात रहायला
हिरवा चारा खायला
गोंडस तिचे वासरू
मजा वाटते पहायला
केंगरे एक मेंढरू
छान त्याला कोकरु
मऊ मऊ अंगावर
काळी पांढरी लोकर
बें बें करत ओरडते
देऊन लांब लकेर
------ जयवंत जाधव, कोवाड.
मोबा. 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा