🌧⛈⚡🌧🌧
पहिला पाऊस
आकाशी मेघ
विजेची रेघ
आवाज बघ
कुठून आले ?
वायु हा मंद
मातीत गंध
मन हे धुंद
कशाने झाले ?
झाडांची पर्णे
प्राण्यांची कर्णे
ऐकती गाणे
टपटपते.
पहिले पाणी
वाहता रानी
पिऊन झणी
तृप्त तरु ते.
⛈🌱🌨🌿🌨🌱⛈
_,,,,, जयवंत जाधव, कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मोबा .९४०३४६३८८१
"काहुर " काव्यसंग्रहातून.........
No comments:
Post a Comment