बालकविता- सोनूचे संग्रहालय
घरामध्ये कुत्रा असे
आणि मांजरही दिसे
सोनूलाच भान नसे
त्याचे छंद किती नि कसे
चार चार खिसे शिंपले
आणि दहा वीस पिसे
भांड्यामध्ये कासव
नि बाटलीमध्ये मासे
कितीतरी बदक
निकितीतरी ससे
घर म्हणजे सोनूचे
संग्रहालयच भासे
जयवंत जाधव, कोवाड
मोबा..9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा