बालकविता
आता कसं होणार
आता कसं होणार तिचं
आता काय होणार
वाघोबा सोबत शेळीही
गुहेमध्ये राहणार
आता कसं होणार तिचं
आता काय होणार
उंदरासोबत मांजरही
बिळामध्ये राहणार
आता कसं होणार तिचं
आता काय होणार
कोकीळे सोबत गाढवही
सुरामध्ये गाणार
आता कसं होणार तिचं
आता काय होणार
पण तुला काय त्याचं
आणि तुझं काय जाणार??
जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा